डिझाइन थिंकिंग: ज्या सिस्टम्स लोक खरोखर वापरतात
डिझाइन थिंकिंग ही अडचणी सोडवण्याची अशी पद्धत आहे जी तंत्रज्ञानापासून नाही, तर सिस्टम वापरणाऱ्या माणसांपासून सुरू होते. Neodeus प्रत्येक प्रकल्पात याचे पाच टप्पे वापरते: समजून घेणे (Empathise), अडचणीची नेमकी मांडणी (Define), उपाय शोधणे (Ideate), प्रोटोटाइप (Prototype) आणि चाचणी (Test). त्यामुळे आम्ही बनवलेले सॉफ्टवेअर लोकांच्या रोजच्या कामात सहज बसते.
हे का महत्त्वाचे आहे?
फसलेल्या बहुतेक सॉफ्टवेअर सिस्टम्समध्ये कोडिंग बरोबर असते, पण मूळ अडचणच चुकीची समजून घेतलेली असते. एखाद्या क्लर्कला तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागणे, अधिकाऱ्याला हवा तो रिपोर्ट वेळेवर न सापडणे किंवा शेतकऱ्याला पावती न समजणे — या सर्व डिझाइनमधील चुका आहेत. सॉफ्टवेअर बनून गेल्यावर त्या दुरुस्त करण्यापेक्षा आधीच टाळणे खूप स्वस्त आणि सोपे पडते.
आम्ही प्रत्यक्ष वापरतो ते पाच टप्पे
- 1
1. समजून घेणे (Empathise)
आम्ही काय करतो
ऑफिस, कारखाना किंवा प्रत्यक्ष फील्डवर भेट देणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते फ्रंट-लाइन कर्मचारी आणि सामान्य नागरिकांपर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे निरीक्षण करणे व त्यांच्याशी संवाद साधणे.
तुम्हाला काय पाहायला मिळते
फील्ड नोट्स, युजर प्रोफाइल्स, सध्याच्या कामकाजाचा नकाशा (User Journey Map) आणि त्यातील नेमक्या अडचणी.
- 2
2. नेमकी मांडणी (Define)
आम्ही काय करतो
प्रत्यक्ष पाहणीतून समजलेल्या बाबींमधून मूळ अडचणीचे स्पष्ट विधान (Problem Statement) आणि मोजता येतील असे अपेक्षित परिणाम नेतृत्वाच्या संमतीने निश्चित करणे.
तुम्हाला काय पाहायला मिळते
स्पष्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट, यशाचे मोजमाप आणि कामाची व्याप्ती (Scope).
- 3
3. उपाय शोधणे (Ideate)
आम्ही काय करतो
युजर्स आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत कार्यशाळेत (Workshops) पर्यायांवर चर्चा करणे; प्रक्रिया सोप्या करणे; नियम आणि डेटा मॉडेलचा मसुदा तयार करणे.
तुम्हाला काय पाहायला मिळते
सर्वांच्या संमतीने ठरलेली सोल्यूशन कन्सेप्ट आणि भविष्यातील सुधारित कार्यपद्धती.
- 4
4. प्रोटोटाइप (Prototype)
आम्ही काय करतो
मोठे कोडिंग किंवा डेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वीच, क्लिक करून पाहता येतील अशा स्क्रीन्स आणि नमुना डेटा (Sample Data) झटपट तयार करणे.
तुम्हाला काय पाहायला मिळते
तुम्ही स्वतः वापरून पाहू शकाल असे चालणारे प्रोटोटाइप्स (Working Prototypes).
- 5
5. प्रत्यक्ष चाचणी (Test)
आम्ही काय करतो
तयार केलेले प्रोटोटाइप्स प्रत्यक्ष युजर्ससमोर ठेवणे, काम करताना ते कुठे अडखळतात ते पाहणे आणि लगेच सुधारणा करणे. काम पूर्णपणे सहज होईपर्यंत ही चाचणी करणे.
तुम्हाला काय पाहायला मिळते
युजेबिलिटी चाचणीचे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष युजर्सनी पसंत केलेले अंतिम डिझाइन.
आमच्या कामाच्या पद्धतीतच अंतर्भूत
- आमच्या कामातील आयडिएशन आणि डिझाइनचे टप्पे डिझाइन थिंकिंगवरच आधारलेले असतात, आणि प्रत्येक नवीन रिलीजच्या वेळी याची पुन्हा उजळणी होते.
- कोणतेही प्रॉडक्ट लाइव्ह करण्यापूर्वी स्टेज-गेट म्हणून युजर-एक्सपीरियन्स (UX) रिव्ह्यूमधून जातेच.
- आम्ही भारतातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन डिझाइन करतो: अनेक भाषा, कमी इंटरनेट स्पीड (Low Bandwidth), एकाच डिव्हाइसवर अनेक युजर्स आणि कॉम्प्युटर नव्यानेच वापरणारे लोक.
- आमच्या नेतृत्वाने 'Interaction Design Foundation' कडून डिझाइन थिंकिंग आणि UX डिझाइनचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
प्रश्नोत्तरे
डिझाइन थिंकिंगमुळे प्रकल्पाचा वेळ वाढतो का?
उलट यामुळे पुढचा वेळ वाचतो. सुरुवातीचे काही आठवडे अभ्यास आणि प्रोटोटाइपिंगवर दिल्यामुळे सॉफ्टवेअर लॉन्च झाल्यानंतर होणारे कित्येक महिन्यांचे पुन्हा काम (Rework) टळते.
तुम्ही आमच्या टीमसाठी स्वतंत्र डिझाइन थिंकिंग वर्कशॉप्स घेऊ शकता का?
हो, नक्कीच. आम्ही वरिष्ठ नेतृत्व, कर्मचारी आणि प्रत्यक्ष युजर्ससाठी प्रॉब्लेम डिस्कव्हरी व को-क्रिएशन वर्कशॉप्स घेतो — मग तो एखाद्या प्रोजेक्टचा भाग असो किंवा स्वतंत्र वर्कशॉप असो.
तुम्हाला कोणती अडचण सोडवायची आहे, ते आम्हाला सांगा.
आम्ही कशी मदत करू शकतो, किंवा करू शकत नाही, हे आम्ही स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगू.
