तुमच्या व्यवसायासाठी बनवलेले ERP, तुम्हाला हव्या त्या मालकी पर्यायासह

थोडक्यात

डोमेन-स्पेसिफिक ERP म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्योगाच्या कामाच्या पद्धती, तिथलेच शब्द आणि नियम यांच्याभोवती गुंफलेले बिझनेस सॉफ्टवेअर. Neodeus प्रत्येक ERP एका सिद्ध झालेल्या मूळ गाभ्यावर (Proven Core) तयार करते. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या व्यवसायाच्या वेगळेपणासाठीच पैसे मोजता — मूलभूत सुविधा पुन्हा शून्यातून बनवण्यासाठी किंवा एखादे सर्वसाधारण सॉफ्टवेअर ओढून-ताणून बसवण्यासाठी नाही.

विशेष व्यवसायांसाठी स्टँडर्ड ERP कुठे कमी पडतात?

  • दरवर्षी, प्रत्येक युजरमागे पैसे मोजावे लागतात. सॉफ्टवेअर तुमच्या कामात नीट बसो वा न बसो, लायसन्स फी मात्र चालूच राहते.
  • त्यानंतर ते तुमच्या कामात बसवण्यासाठी पुन्हा वेगळा खर्च करावा लागतो. इम्प्लिमेंटेशन पार्टनर त्यात कस्टमायझेशन करतात, आणि पुढे सॉफ्टवेअर अपग्रेड झाले की हे कस्टमायझेशन अनेकदा बिघडते.
  • आणि तरीही तुमचे मुख्य काम ERP च्या बाहेरच राहते. तुमच्या व्यवसायाला वेगळे ठरवणारे महत्त्वाचे टप्पे शेवटी रजिस्टर, एक्सेल शीट्स आणि WhatsApp वरच चालतात.

स्टँडर्ड ERP की Neodeus ERP

नेहमीचे स्टँडर्ड ERPNeodeus ERP
सुरुवात कुठून होतेसर्व उद्योगांसाठी एकच सर्वसाधारण साचा (Template)तुमच्या उद्योगातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांसोबत समजून घेतलेल्या प्रक्रिया
तुमच्या व्यवसायाचे खास टप्पेनंतर वरून कस्टमायझेशन म्हणून जोडले जातातपहिल्या दिवसापासूनच मूळ डिझाइनमध्ये समाविष्ट असतात
स्क्रीनवरील भाषा आणि शब्दसर्वसाधारण (Generic) तांत्रिक शब्दतुमच्या व्यवसायात रोज वापरले जाणारे परिचित शब्द
अकाउंटिंगचालवण्यासाठी अनेकदा अकाउंटंटची गरज लागतेरोजच्या व्यावसायिक एन्ट्रींमधून हिशेब आपोआप पोस्ट होतात
पेमेंटचे पर्यायदरवर्षी लायसन्स फी + इम्प्लिमेंटेशनचा वेगळा खर्चसबस्क्रिप्शन, स्वतःचा सर्व्हर किंवा एकरकमी (One-time) खरेदी
अपग्रेड्सअपग्रेड्समुळे आधी केलेले कस्टमायझेशन बंद पडू शकतेइंडस्ट्री लेयर (Industry Layer) हा मूळ प्रॉडक्टचाच भाग असतो
तुमचा डेटाबहुतेकदा व्हेंडरच्याच क्लाउडवर राहतोआमच्या क्लाउडवर किंवा तुमच्या स्वतःच्या सर्व्हरवर — दोन्हीकडे पूर्णपणे एन्क्रिप्टेड

प्रत्येक ERP च्या मुळाशी एकच सिद्ध गाभा (Proven Core)

एखाद्या इमारतीच्या मुख्य वायरिंग आणि प्लंबिंगचा विचार करा: प्रत्येक नवीन मजला स्वतःची वेगळी लाइन टाकण्याऐवजी मुख्य लाइनलाच जोडला जातो. तसेच प्रत्येक Neodeus ERP आमच्या आधीच सिद्ध झालेल्या सामायिक सेवांवर (Shared Services) चालते.

ERP घेण्याचे तीन पर्याय

सबस्क्रिप्शन (SaaS)स्वतःच्या सर्व्हरवर (On-premise)एकरकमी खरेदी (One-time Purchase)
हे कसे चालतेहोस्टिंग आणि देखभाल आम्ही करतो; तुम्ही थेट ब्राउझर किंवा ॲपवरून वापरताआम्ही तुमच्या ऑफिसमधील सर्व्हरवर किंवा तुम्ही निवडलेल्या क्लाउडवर इन्स्टॉल करून देतोतुम्ही सॉफ्टवेअर लायसन्ससाठी एकदाच एकरकमी पेमेंट करता
अपडेट्सआपोआप मिळतातवार्षिक सपोर्ट कराराद्वारे (AMC/Support Agreement)वार्षिक सपोर्ट कराराद्वारे (AMC/Support Agreement)
कोणासाठी सर्वात योग्यवेगळा IT स्टाफ न ठेवता लगेच काम सुरू करणाऱ्यांसाठीस्वतःचा डेटा स्वतःच्याच सर्व्हरवर ठेवू इच्छिणाऱ्यांसाठीदरवर्षी भाडे देण्याऐवजी एकदाच भांडवली गुंतवणूक (CapEx) पसंत करणाऱ्यांसाठी

स्टँडर्ड ERP कधी जास्त योग्य ठरते?

जर तुमचा व्यवसाय नेहमीचा ट्रेडिंग किंवा सर्वसाधारण सेवांचा असेल आणि त्यात कोणतीही वेगळी कार्यपद्धती नसेल, तर बाजारातील स्टँडर्ड ERP तुमच्यासाठी पुरेसे ठरू शकते. तसे असल्यास आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो.

प्रश्नोत्तरे

खास आपल्या व्यवसायासाठी बनवलेले ERP महाग पडत नाही का?

आम्ही प्रत्येक ERP आमच्या आधीच तयार असलेल्या 'कोअर प्लॅटफॉर्म'वर उभारतो. त्यामुळे तुम्ही मुख्यतः तुमच्या व्यवसायासाठी ज्या खास गोष्टी बनवाव्या लागतात त्यासाठीच पैसे देता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही संपूर्ण खर्चाचा अंदाज लेखी देतो.

आम्ही सुरुवातीला सबस्क्रिप्शन घेऊन नंतर स्वतःच्या सर्व्हरवर शिफ्ट होऊ शकतो का?

हो, परस्पर संमतीने हे शक्य आहे. आम्ही तुमचा संपूर्ण डेटा सुरक्षितपणे ट्रान्सफर करून तुमच्या सर्व्हरवर सिस्टम सेट करून देतो; याच्या अटी कामाच्या स्वरूपानुसार ठरवल्या जातात.

याचे मेंटेनन्स आणि देखभाल कोण पाहते?

आम्ही स्वतः पाहतो. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये मेंटेनन्स समाविष्ट असते, तर स्वतःच्या सर्व्हरवरील किंवा एकरकमी खरेदी केलेल्या ERP साठी सपोर्ट कराराद्वारे सेवा दिली जाते.

तुम्हाला कोणती अडचण सोडवायची आहे, ते आम्हाला सांगा.

आम्ही कशी मदत करू शकतो, किंवा करू शकत नाही, हे आम्ही स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगू.

आमच्याशी बोला